महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुलै ।।
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
कौटुंबिक चर्चेला प्राधान्य द्यावे. घरात काही नवीन बदल करण्याचा विचार कराल. कामातून मनाजोगे समाधान लाभेल. आळस झटकून टाकावा. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
परदेशातील आप्तांकडून शुभ वार्ता मिळतील. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. प्रत्येक गोष्टीचा रसास्वाद घ्याल. जवळच्या मित्राची नाराजी दूर करावी. मधुर वाणीने सर्वांना जिंकून
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
उगाचच निषेध नोंदवायला जाऊ नका. बौद्धिक चर्चेत सहभाग घ्याल. स्वत:चे मत ठसवून सांगा. अती चिकित्सा करू नका. वेळेचे योग्य नियोजन करा.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
कौटुंबिक कामातून आनंद मिळेल. व्यवसायातून चांगला लाभ होईल. मनाजोगी खरेदी करता येईल. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. तब्येतीत सुधारणा होईल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. दिवस मध्यम फलदायी राहील. किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कलेचे कौतुक केले जाईल. नवीन लोक संपर्कात येतील.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
उगाचच मतभिन्नता दर्शवू नका. वादाच्या मुद्द्यापासून दूर राहावे. पोटाच्या तक्रारी वाढू शकतात. व्यापक दृष्टिकोन ठेवावा लागेल. सकारात्मक विचारांची जोड द्यावी.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
आजचा दिवस चांगला जाईल. कामे अपेक्षित वेळेत पूर्ण होतील. उत्साह कमी पडू देऊ नका. नातेवाईकांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
नवीन कामातून समाधान मिळेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. वैवाहिक सौख्याने सुखावून जाल. छोट्या प्रवासाचे बेत आखाल. काही किरकोळ कौटुंबिक कटकटी राहतील.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
अडचणीतून मार्ग काढणे क्रमप्राप्त आहे. कौटुंबिक खर्च वाढू शकतात. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. मदतीचा हात पुढे कराल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. घरातील वातावरण मंगलमय राहील. भावंडांची चिंता लागून राहील. निरूत्साही भावना काढून टाका. शांत व संयमी विचार करावा.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
संपर्कातील लोकांची मदत मिळेल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. बौद्धिक दृष्टिकोन ठेवून विचार कराल. घरातील स्वच्छतेबाबत दक्षता बाळगाल. बागकामाची आवड जोपासाल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope )
क्रोध वृत्तीला आवर घालावी. जोमाने कामे पूर्ण कराल. मेहनतीला कमी पडू नका. सारासारविचार करून वागणे ठेवा. स्वतंत्र वृत्तीचा आग्रह धराल.