LPG Price: कमर्शियल सिलिंडरच्या गॅसच्या किंमतीत घट; किंमती ५८ रुपयांनी घसरल्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जुलै ।। दर महिन्याच्या एक तारखेला एलपीजी गॅसच्या नवीन किंमती जाहीर होत असतात. आज पुन्हा ऑइल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या नवीन किंमती अपडेट केल्या आहेत. आज सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज एलपीजी गॅसच्या किंमती कमी झाल्या झाल्या आहेत. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी गॅसच्या किंमती जाहीर केल्या आहेत.

सिलिंडरच्या किंमतीत ५८.५० रुपयांनी घट
जुलै महिन्यात १९ किलो वजनाच्या कमर्शियल सिलिंडरच्या किंमतीत ५८.५० रुपयांनी कपात झाली आहे. हे नवीन आजपासून देशभर लागू करण्यात आले आहेत. यामुळे मुंबईत १९ किलो वजनाच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरची किंमत १६१६ होणार आहे. ही किंमत मे महिन्यात १६९९ रुपये होते.

शहरांमधील सिलिंडरच्या किंमती (LPG Gas Price Cut)
इतर शहरांमध्येही सिलिंडरच्या किंमतीत कपात झाली आहे. दिल्लीत १९ किलो वजनाचे सिलिंडरची किंमक आजपासून १६६५ रुपये होणार आहे. ही किंमत याआधी १७२३.५० रुपये होती. कोलकत्तामध्ये सिलिंडरची किंमत १७६९ रुपये झाली आहे. या किंमतीत ५७ रुपयांनी घट झाली आहे.

कमर्शियल सिलिंडरच्या किंमतीत कपात झाली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबा अशा व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी कमर्शियल गॅस वापरला जातो. दरम्यान, घरगुती एलपीजी गॅसच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.या किंमती जशाच तशा आहेत.

याआधीही जून महिन्यात एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल झाला होता. कमर्शियल गॅसच्या किंमतीत २४ रुपयांनी घट झाली होती. त्यामुळे सलग दुसऱ्या महिन्यात एलपीजी गॅसच्या किंमती कमी झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *