नांदेड जिल्हा गुन्हेगारीमुक्त करणार –विजयकुमार मगर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ ऑगस्ट – नांदेड :-कर्तव्य कठोर खात्यात काम करीत असतांना अनेक कसोट्यांवर उतरावे लागते नांदेड जिल्हाचा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेताना थोडी भीती होती. कारण येथील मातीतील माणसांचा लोकप्रतीनिधींचा व पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्वभाव ओळखने कठीण असते.मात्र नांदेडची भुमी ही.श्री.गुरूगोविंद सिंग च्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे.

पवित्र गोदावरी नदी आणि संत महात्म्यांची भुमी असल्याने मला एक वर्ष कसे गेले आहेत समजलेच नाहीत.खरच जिल्यातील लोकप्रतिनिधी नागरिक आणी माध्यम हे अधिकाऱ्याला समजून घेऊन वेळप्रसंगी कठीण काळात त्यांच्या सोबत राहून काम करतात हे वा खान्या जोगेआहे.येणाऱ्या काळात कुख्यात रिंदा व त्याच्या काही साथीदारांच्या मुसक्या आवळण्याचा प्लॅन केला असून गुन्हेगारांची गय केली जाणार नाही असे मत पोलीस अधीक्षक विजय कुमार मगर यांनी त्यांच्या कार्यच्या वर्षपुर्ती निमित्त व्यक्त केले.जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी नांदेड पोलीस अधीक्षकाचा पदभार घेतल्यानंतर सोमवारी दि.24 ऑगस्ट रोजी त्यांना एक वर्ष पूर्ण झाले.अधीक्षक पदावर काम करीत असतांना प्रामुख्याने त्यांनी गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या, कुख्यात गुन्हेगार व हस्तकांना प्रतिबंध करण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या.

शहरात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण करणे,खंडणी वसूल करणे,गोळीबार अश्या घटनांचा बीमोड केल्याचे त्यांनी म्हटले आहे.दरम्यान भारतीय हत्यार कायद्यान्वये 38 प्रकरणात कारवाई करण्यात आली.यात 14 देशी बनावटीचे पिस्तुल 39 जिवंत काडतूस तलवार ख॔जरसह घातक शस्त्र जप्त केली.महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याप्रमाणे मोक्का अंतर्गत वेगवेगळ्या दोन गुन्ह्य़ात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.31आरोपी पैकी 26आरोपींना अटक करण्यात यश मिळवल व इतवारा पोलीस ठाणे अंतर्गत मोक्याच्या गुन्ह्यात एका पोलीस निरीक्षकाला अटक केली.56 जण गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली.म्हणुन त्यांच एकच ही की,नांदेड जिल्हा हा गुन्हेगारीमुक्त करण्याच आहे.असे मनोगत वैक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *