कोरोना काळात डाॅक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी हेच खरे देवदूत – आमदार अण्णा बनसोडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ ऑगस्ट – पिंपरी चिंचवड :-पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी लोकमान्य हॉस्पिटलला भेट दिली व गणरायाची आरती केली,कोरोना विषाणूंच्या संकटातून राज्य व देशाची लवकर सुटका व्हावी, असे साकडे त्यांनी गणरायाला घातले.

कोरोना काळात प्रामाणिक कर्तव्य बजावणाऱ्या डाॅक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी हेच खरे देवदूत असून गणपती बाप्पाने त्यांना लढण्याचे बळ द्यावे, असे हि आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितलेलोकमान्य हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी धैर्य दाखवून या कठीण काळात काम केले असून हिच खरी ईश्वर सेवा असल्याचेही ते म्हणाले.

याप्रसंगी डॉ. जयवंत श्रीखंडे, महेश भोसले, राजेश देशमुख, सहदेव गोळे, सिद्धार्थ गजरमल, संगीता कदम, भरत गराडे, राज प्रेमा, राजेंद्र कदम, प्रभाकर पाटील, वैशाली बावस्कर, सुनिल पवार, प्रितम वरधान, रोहिणी सरफले, अनंत वैद्य, डॉ. पुष्पराज पटेल, डॉ. नामदेव कलाले, संतोष जगताप, मारुती चव्हाण, स्मिता गवळी, डॉ. स्वप्निल पाटील, स्नेहल मिकूले, प्रदिप सपकाळ, दशरथ खेत्रे, जेस्सी बिजी यांचा सन्मान करण्यात आला.

लोकमान्य हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी प्रास्ताविक केले. गृप सीईओ सुनील काळे, कर्मचारी प्रतिनिधी अध्यक्ष मधुकर काटे यांनी स्वागत केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *