महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जुलै ।।बल्गेरियाची भविष्यवेत्ता बाबा वेंगा ही नास्त्रेदमस सारखीच जगात लोकप्रिय आहे. तिच्या गूढ काव्यात भविष्यातील अनेक दावा करण्यात आले आहेत. त्यानुसार, जगभरात अनेक दावे करण्यात येतात. तिच्या काही भविष्यवाण्या या खऱ्या पण ठरल्या आहेत. तिला बाल्कनचा नास्त्रेदमस पण म्हटल्या जाते. तिची अनेक भाकीतं चर्चेत आली आहेत. पण त्यातील कोणती भाकीत खरी ठरली?
Baba Vanga हिचा जन्म 1911 मध्ये झाला होता. बाबा वेंगा हिची अचानक दृष्टी गेली. पण तिला अद्भूत शक्तीमुळे भविष्यातील जागतिक घडामोडी दिसू लागल्या. त्यातील अनेक वस्तू, ठिकाणांचं नाव तिला माहिती नसल्याने ते वर्णन करताना काही त्रुटी उरल्या असतील. पण तिने जे वर्णन केले, ते खरं ठरले. तिच्या भाकितात चीनचा उदय, 9/11 चा हल्ला, राजकुमारी डायना हिचा मृत्यू, त्सुनामी यासह अनेक घटनांचा उल्लेख आहे.
बाबा वेंगा हिने कित्येक वर्षांपूर्वी वर्तवलेल्या घटनांचा संबंध 2025 शी लावण्यात येतो. त्यातील काही भाकीतं अचूक ठरली आहेत. बाबा वेंगा हिने 2025 मध्ये एक भूकंप येईल असे म्हटले होते. म्यानमार, व्हिएतनाममध्ये भूकंप आला. त्यात 1700 लोकांना प्राण गमवावे लागले. तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक जण जायबंदी झाले. 2025 मध्ये तिने एखाद्या प्रदेशात भूकंप होईल, असा खास संदेश दिला नाही. तिने असा काही दावा केल्याचा अधिकृत पुरावा समोर आलेला नाही. पण म्यानमार, व्हिएतनामधील या भूंकपाने तिची आठवण करून दिली.
न्यूयॉर्क पोस्टमधील एका वृत्तानुसार, 2025 साठी वेंगाने युरोपमध्ये युद्ध होण्याचे आणि आर्थिक संकट येण्याचे भाकीत केले आहे. बाबा वेंगाच्या दाव्यानुसार, 2025 पासून मानवतेचे पतन 2025 पासून सुरू होईल. बाबा वेंगाच्या भाकितानुसार, जगाचा अंत 5079 मध्ये होईल. तिचे इतर पण अनेक भाकीतं आहेत, त्याची चर्चा होत असते.