10% Tariff On BRICS: ट्रेड डीलनंतर भारताला घाव देण्याच्या तयारीत ट्रम्प, नवीन ट्रेड वॉर सुरु होणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जुलै ।। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांवर 10% कर लादण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी भारतासह ब्रिक्स देशांवर अतिरिक्त कर लादण्याचा इशारा पुन्हा दिला असून ब्रिक्स गट अमेरिकन डॉलर कमकुवत करण्याचे काम करत असल्याचा आरोप केला आहे.

ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना चेतावणी
ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “ब्रिक्समध्ये समाविष्ट देशांना लवकरच 10% कर भरावा लागेल. अमेरिकेला हानी पोहोचवण्यासाठी ब्रिक्सची स्थापना करण्यात आली होती.” ट्रम्प यांनी ब्रिक्स समूहावर अमेरिकन डॉलर कमकुवत करण्याचे काम केल्याचा आरोप केला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ट्रम्प यांनी कडक इशारा देत म्हटले की, “जर ते ब्रिक्समध्ये असतील तर त्यांना 10% कर भरावा लागेल कारण ब्रिक्सची स्थापना आम्हाला दुखावण्यासाठी, आमच्या डॉलरचे अवमूल्यन करण्यासाठी झाली होती.”

ट्रम्प यांच्याकडून ब्रिक्सवर टीका
ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यासह 11 देशांच्या ब्रिक्स समूहाने ट्रम्पच्या टॅरिफ धोरणांवर टीका केली आणि त्यांना जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांशी विसंगत असल्याचे म्हटले. ब्रिक्स देशांचा एकत्रितपणे जागतिक जीडीपीमध्ये 40% वाटा असून जगाच्या जवळजवळ अर्ध्या लोकसंख्येचा वाटा आहे. ब्राझील, रशिया, भारत आणि चीन ब्रिक्स समूहाचे सुरुवातीचे सदस्य असून 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेला सामील होण्यास आमंत्रित केले गेले. त्यानंतर सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, इथिओपिया, संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशिया यांनाही स्वागत करण्यात आले आणि अशाप्रकारे, ब्रिक्स युतीतील एकूण सदस्य देशांची संख्या 11 झाली.

ट्रम्प म्हणाले डॉलरच ‘राजा’
ट्रम्प प्रशासन सध्या द्विपक्षीय व्यापार करारांसाठी जोर देत आहे, ज्या देशांनी अमेरिकेशी करार केलेला नाही त्यांच्यासाठी 1 ऑगस्टपासून नवीन शुल्क लागू होणार आहेत. अमेरिकन डॉलरच्या ताकदीबद्दलच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना ट्रम्प म्हणाले, ‘डॉलर हा राजा आहे, आम्ही तो तसाच राहील. मी फक्त एवढेच म्हणतोय की लोकांना आव्हान द्यायचे असेल तर ते तसं करू शकतात पण, त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल आणि मला वाटत नाही की त्यापैकी कोणीही ती किंमत मोजण्यास तयार असेल.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *