महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जुलै ।। मानव नेहमीच भविष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. मग ते स्वत:विषयी असू दे किंवा जगाविषयी… सध्या बाबा वेंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानच्या रियो तात्सुकी यांच्या भविष्यवाणीचीही सर्वत्र चर्चा आहे. 5 जुलै नंतर जपानमध्ये मोठं संकट येणार अशी भविष्यवाणी रियो तात्सुकी यांनी केली होती. आता ही भविष्यवाणी खरी होताना दिसत आहे. जपानला वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा तडाखा बसलाय…माणसांना उभं राहणंही शक्य नव्हतं…गाड्याही हवेत मागे मागे जात होत्या. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे वाहनेही पाण्याखाली गेलीत. त्यातच रियो यांनी ज्वालामुखी असल्याचा इशारा दिला होता. आणि आता ते ही प्रत्यक्षात आलं.
अखेर ज्वालामुखीचा उद्रेक !
हवाई येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. हवाई हे उत्तर अमेरीकेतील राज्य असून एक बेटसमूह आहे. हवाईच्या बिग आयलंडवरील माउंट किलौआ ज्वालामुखीचा उद्रेक झाला. सलग नऊ तास उद्रेक सुरू होता. त्यातून 1200 फूट उंचीपर्यंत लाव्हाचे फवारे बाहेर पडत होते.
रियो तात्सुकी जपानी मंगा कलाकार आहेत. त्यांच्या 1999 च्या “द फ्युचर आय सॉ” या पुस्तकात त्यांनी भविष्यातील अनेक घटनांचा उल्लेख केला.
जपान आणि फिलीपिन्स दरम्यान समुद्राच्या तळातील भेगा 2011 च्या तोहोकू भूकंपापेक्षा मोठ्या लाटा निर्माण करतील
2030 मध्ये विषाणूंचा मोठा धोका असल्याचा इशाराही दिला आहे.
रियो तात्सुकींनी 5 जुलैला जपानमध्ये भीषण त्सुनामी येईल, अशी भविष्यवाणी केली होती मात्र ती यावेळी प्रत्यक्षात आलेली नसली तरी ती 15 वर्षांच्या चक्रानुसार प्रत्यक्षात येतील असं सांगितल जातंय. त्यामुळे नवीन बाबा वेंगाची या भाकितांचा धसका भविष्यातही कायम राहणार