साजरे करा तुमचे सहजीवन – सत्यम ज्वेलर्स मंगळसूत्र महोत्सवासोबत!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुलै ।। श्रावण महिना… पवित्रतेचा, मंगलतेचा आणि उत्सवांचा संगम असलेला महिना. या महिन्याचे महत्त्व भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण आहे. सण-उपवास, गोड धोड, धार्मिक विधी आणि स्त्रीचं चैतन्य यांचा अविभाज्य भाग म्हणजे हा श्रावण. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोपाळकाला, श्रीकृष्ण जन्माष्टमी अशा एकापेक्षा एक लोकोत्सवांमुळे या महिन्याला खास उर्जा प्राप्त होते.

हीच उत्साहाची लाट अधिक उंचावते ती ‘सत्यम ज्वेलर्सच्या मंगळसूत्र महोत्सवामुळे’!
भारतीय संस्कृतीमध्ये मंगळसूत्राला एक पवित्र, वैवाहिक नात्याचे प्रतीक म्हणून मानले जाते. स्त्रीसाठी तिच्या दागिन्यांमध्ये सर्वात अधिक जिव्हाळ्याचा आणि जपून ठेवलेला दागिना म्हणजे मंगळसूत्र. त्यामागे असतो तिचा अभिमान, तिचं प्रेम, तिचं समर्पण.

सत्यम ज्वेलर्स – निगडी, पिंपरी-चिंचवड,आणि चाकणचा एक विश्वासार्ह, लोकप्रिय आणि अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनात घर करून बसलेला ब्रँड – या वर्षी मंगळसूत्र महोत्सवात घेऊन येत आहे पारंपारिक ते आधुनिक अशा असंख्य व्हरायटीज आणि डिझाइन्स. ह्या महोत्सवात केवळ सौंदर्य नाही, तर आहे तुमच्या सहजीवनाच्या आठवणींना उजाळा देणारा एक अनोखा अनुभव.

सत्यम ज्वेलर्स यांची यंदाची कल्पना काही खास आहे.
यामध्ये साधारणपणे स्त्रिया आपल्या आवडत्या दागिन्यांबद्दल बोलताना आणि विशेषतः मंगळसूत्राबद्दल बोलताना आपल्या भावना दर्शवताना उत्साही असतात पण खरं सांगायचं झालं तर पुरुषही यामध्ये काही कमी नाहीत. आपल्या पत्नीबरोबर सहजीवनाचा आनंद घेतानाच पुरुषांनाही एका गोष्टीचा अभिमान आहे. तो म्हणजे आपल्या नावाने आपली पत्नी मंगळसूत्र परिधान करते आणि ह्या सहजीवनात अनेक चढउतारांत आपली साथ देते, सहजीवन साजरे करते!

ह्याबरोबरच खास तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी!
सत्यम ज्वेलर्स मंगळसूत्र महोत्सवा निमित्ताने घेऊन आले आहेत एक आकर्षक ऑफर! आपले आवडते मंगळसूत्र खरेदी करा आणि मंगळसूत्राच्या घडणावळीवर मिळवा तब्बल ५०% पर्यंत सूट!होय, तुमचं आवडतं मंगळसूत्र खरेदी करा आणखी खास किमतीत! हा भव्य महोत्सव २५ जुलै २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत साजरा होणार आहे. निगडी, चाकण आणि कृष्णा नगर येथील सत्यम ज्वेलर्सच्या शाखांमध्ये तुम्ही ही ऑफर अनुभवू शकता.

तर मग, प्रेमाच्या या पवित्र नात्याला द्या एक नवीन तेज! आजच भेट द्या सत्यम ज्वेलर्सला आणि साजरा करा तुमचं सहजीवन एका सुंदर मंगळसूत्रासोबत!

ही केवळ खरेदीच नव्हे, तर नात्यांचा आणि आठवणींचा उत्सव आहे! सत्यम ज्वेलर्सचे खास वैशिष्ट्य म्हणजे केवळ दागिन्यांची कला-कुसर नव्हे, तर ग्राहकांशी जोपासलेलं नातं! सत्यम ज्वेलर्सची नम्र आणि तत्पर सेवा, परंपरेचा अभिमान आणि आधुनिकतेची जाण यामुळे सत्यम ज्वेलर्स हे नाव पिंपरी-चिंचवड परिसरात आज एक आदर्श ठरलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *