महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – अजयसिंग – नवीदिल्ली – दि. १ सप्टेंबर – पेट्रोलियम कंपन्यांनी आज मंगळवारी पेट्रोल दरात ४ ते ५ पैशांची वाढ केली. यामुळे आज मुंबईत पेट्रोलचा दर प्रती लीटर ८८.७३ रुपये झाला आहे. तर दिल्लीत तो ८२.०८ रुपये झाला आहे. दरम्यान डिझेल दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर असून देखील पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. मागील महिनाभर कंपन्यांनी डिझेलची किंमत स्थिर ठेवली होती. आज पुन्हा एकदा पेट्रोलच्या किमतीत वाढ करण्यात आली.
सोमवारी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर होते. १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत तब्बल १२ दिवस पेट्रोल दरात वाढ झाली आहे. यातून पेट्रोल सरासरी १.६० रुपयांनी महागले होते.