महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ ऑगस्ट ।। येथील नाना नानी पार्क कापसे उद्यान येथे स्तनपान सप्ताहानिमित्त डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल मेडीकल कॉलेज, बाह्यरुग्ण विभाग अजमेरा UHTC अंतर्गत स्तनदा माता, गरोदर महिला यांच्या साठी एक खास आणि मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित केला होता
यामध्ये महिलांना स्तनपानाचे फायदे, स्तनपान करताना काही अडचणी, समस्या याबद्दल व इतर बऱ्याच गोष्टींवर माहिती व मार्गदर्शन डॉक्टर यांनी केले
या कार्यक्रमाला बर्याच गरोदर महिला , व इतर महिला भगिनीनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला उपस्थित महिलांना राजगिरा लाडू , सफरचंद , केळी वाटप करण्यात आली सर्व महिला डाॅक्टर व आशा वर्कर यांचे सौ.रेणुकाताई भोजने यांनी आभार मानले कार्यक्रमास डाॅ.डि.वाय. पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालय , अजमेरा बाह्य़रुग्ण विभाग यांचे सहकार्य लाभले