Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींना विचारणार हे ५ प्रश्न ; निकषांमध्ये बसत असतील तर…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑगस्ट ।। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जुलैचा हप्ता देण्यात आला आहे. यानंतर लवकरच ऑगस्टचेही पैसे दिले जातील. परंतु जवळपास ४२ लाख महिलांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही. या योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. लाडक्या बहि‍णींच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे.

अंगणवाडी सेविकांकडून होणार पडताळणी (Ladki Bahin Yojana Re Verification)
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी अंगणवाडी सेविकांकडून होणार आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या अर्जांची छाननी करणार आहे. दरम्यान, महिला लाडक्या बहि‍णींच्या घरी जाऊन त्यांना प्रश्न विचारणार आहे. त्यानंतर त्यांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे.

अंगणवाडी सेविका लाडक्या बहि‍णींना काय प्रश्न विचारणार?
लाडकी बहीण योजनेतून ज्या महिलांना अपात्र ठरवल्या आहेत त्यांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका जाऊन चौकशी करणार आहे. अंगणवाडी सेविका लाडक्या बहि‍णींना काही महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहेत. हे प्रश्न लाडकी बहीण योजनेच्या निकषांशी संबंधित असणार आहे.

महिलांना विचारले जाणारे प्रश्न (What Questions Asked To Ladki Bahin)

तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे का?

तुम्ही इन्कम टॅक्स भरता का किंवा तुमच्या घरातील कोणी इन्कम टॅक्स भरतं का?

तुमच्या घरातील किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे?

तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे?

महाराष्ट्राची रहिवासी असल्याचा पुरावा आहे का? तुमचे वय किती आहे?

जर तुमच्याकडे या प्रश्नांची उत्तरे असतील आणि ही उत्तरे लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत असतील तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, जर तुम्ही वयोगटात बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. महिला सरकारी कर्मचारी नसाव्यात. त्यांच्या घरातील २ पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *