Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
आधी बोलून गेले , माझी कॉपी करणे ...... ; आता संजय गायकवाडांचा यू-टर्न, म्हणाले... - Maharashtra 24

आधी बोलून गेले , माझी कॉपी करणे …… ; आता संजय गायकवाडांचा यू-टर्न, म्हणाले…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ ऑगस्ट ।। शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) महायुतीतील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात सोमवारी राज्यभरात आंदोलन केलं होतं. यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या विरोधात देखील प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले होते. याबद्दल बोलताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षाला माजी कॉपी करणे जमणार नाही. मी ओरिजनल आहे. इतकंच काय तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. यानंतर आता संजय गायकवाड यांनी आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला आहे.

संजय गायकवाड यांचा यू-टर्न
महाराष्ट्रात आणि देशात काल महाविकास आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतल्या आमदारांच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन केले होते. त्यात माझ्या मतदारसंघात सुद्धा बॉक्सिंग मारतानाचा प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. याबाबत मला विचारले असता मी उत्तर दिले होते की. माझे प्रतिकात्मक आंदोलन करण्याची उभाठाच्या कार्यकर्त्याच्या बापाची अवकात नाही, असे म्हटले होते. तुम्ही डायरेक्ट बाळासाहेबांचे नाव केले. माझ्या शब्दाचा विपर्यास करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे हे रक्ताने उद्धव साहेबांचे वडील आहेत. पण बाळासाहेब हे सर्वांचे दैवत आहे व सर्वांचे बाप आहेत. आम्हाला बाळासाहेब ठाकरेंचीच शिकवण आहे. मी उभाठाच्या कार्यकर्त्यांबाबत बोललो होतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *