महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ऑगस्ट ।। सरकारी बँकेत नोकरी मिळावी, असं अनेकांचे स्वप्न असते. बँकेतील नोकरीसीठी तयारी करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती जाहीर केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ऑफिसर होण्याची ही उत्तम संधी आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ५०० पदांसाठी भरती जाहीर केली आहे. जनरलिस्ट ऑफिसर स्केल II पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. bankofmaharashtra.in वेबसाइटवर सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार तुम्ही अर्ज करावेत.
बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही अधिसूचना वाचावी. त्यानंतर अर्ज करावेत.
पात्रता (Eligibility)
बँक ऑफ महाराष्ट्रमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २२ ते ३५वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत चार्टर्ड अकाउंटंटदेखील अर्ज करु शकतात.
पगार
बँक ऑफ महाराष्ट्रमधील या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला ९३,९६० रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या सरकारी बँकेत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ११८० रुपये शुल्क भरायचे आहे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ११८ रुपये शुल्क भरायचे आहे.