एसबीआयचा खातेधारकांना जबर झटका, आजपासून ऑनलाइन पेमेंटसाठी पैसे द्यावे लागणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ ऑगस्ट ।। भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने आपल्या खातेधारकांना जोरदार झटका दिला आहे. एसबीआयने ग्राहकांसाठी ऑनलाईन आयएमपीएस ट्रान्फरवर 15 ऑगस्ट 2025 पासून शुल्क लावण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत ही सुविधा पूर्णपणे मोफत होती. आयएमपीएस एक रियल टाईम फंड ट्रान्सफर सेवा आहे याद्वारे 24 तास आणि वर्षातील 365 दिवस तत्काळ पैसे पाठवू शकता. एकाच वेळी जास्तीत जास्त पाच लाखांपर्यंत पैसे पाठवले जाऊ शकतात, परंतु आता नव्या नियमानुसार, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा यूपीआयद्वारे ऑनलाईन पेमेंट केल्यास पैसे द्यावे लागणार आहेत. 25 हजार रुपयांपर्यंत कोणतेही आयएमपीएस ट्रान्सफरवर शुल्क द्यावे लागणार नाही, परंतु 25,001 रुपये ते 1 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर 2 रुपये आणि जीएसटी द्यावा लागणार आहे. 1 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर 6 रुपये आणि जीएसटी द्यावा लागणार आहे. सरकारी आणि खासगी संस्थेच्या विशेष वेतन पॅकेजच्या खातेधारकांवर हे शुल्क लागू होणार नाही. तसेच शाखेतून शाखेतील आयएमपीएस ट्रान्सफरसाठी आधीप्रमाणे 2 रुपये ते 20 रुपये आणि प्लस जीएसटी शुल्क लागू राहील.

एसबीआयचे नवीन आयएमपीएस चार्जेस

25 हजार ते 1 लाखांपर्यंत – 2 रुपये.
1 लाख ते 2 लाखांपर्यंत – 6 रुपये.
2 लाख ते 5 लाखांपर्यंत – 10 रुपये.

याव्यतिरिक्त जीएसटी वेगळा द्यावा लागणार.
आयएमपीएस एक वेगवान, सुरक्षित आणि 24 तास उपलब्ध असलेली डिजिटल पेमेंट सेवा आहे. ही सेवा बँक खात्यांमध्ये फंड ट्रान्सफर करण्याची सुविधा देते. ही सेवा प्रामुख्याने मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग सेवा, एटीएम सेवा आणि एसएमएस सेवेसाठी ओळखली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *