Pune Traffic: पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार ! पालिका तयार करणार ३० मिसिंग लिंक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ ऑगस्ट ।। पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीकोनातून पुणे महापालिका ३० ‘मिसिंग लिंक’ जोडणार आहे. शहरातील १२ किलोमीटर मिसिंग लिंक जोडल्यानंतर ६० किलोमीटर रस्ते उपलब्ध होणार आहेत. पुणे महनगर पालिकेकडून शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल आणि रस्त्यांच्या रूंदीकरणाचे काम वेगाने केले जात आहे.

पुण्यात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महानगर पालिकेने मिसिंग लिंक जोडण्याचा आरखडा तयार केला आहे. पण मिसिंग लिंकच्या भूसंपादनास योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता महापालिकेने सक्तीने भूसंपादन करण्यास सुरूवात केली आहे. पुण्यातील ३० मिसिंग लिंक जोडण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. राज्य सरकारकडून या निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे.

एकलव्य कॉलेज ते हायवे सुतारवाडी बस डेपो मिसिंग लिंक, चौधरी वस्ती ते फनटाईन रोड, हिंगणे चौक ते व्हीजन क्रिकेट अकॅडमी आणि माणिक बाग ते सन सिटी (कर्वेनगरकडे जाणारा रस्ता) या जागा पुणे महानगर पालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. पण पुण्यातील अनेक ठिकाणी नागरिकांनी मिसिंग लिंकसाठी भूसंपादन देण्यासाठी नकार दिला आहे. त्यामुळे आता महापालिकेकडून सक्तीने भूसंपादन केले जाणार आहे.

या मिसिंग लिंकसाठी होणार सक्तीने भूसंपादन –

कोथरूड कर्वेनगर, वारजे –
डॉ. आंबेडकर चौक ते राजाराम ब्रिज-(जावळकर उद्यान परिसरातील मिळकतींना नोटीस दिल्या आहेत)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते रोजरी स्कूल अंडरपास (निरंजन प्रेस्टीजजवळ, तोडकर अपार्टमेंटजवळ व इंद्रनगरी सोसायटीजवळ)

शीला विहार ते भीमनगर, कोथरूड

मिलन सोसायटी ते कर्वे पुतळा

रजपूत झोपडपट्टी ते म्हात्रे बीज (नदीपात्रातील रस्ता)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *