दुबईपेक्षाही महाग कोकणचा विमान प्रवास …,; तिकीट तब्बल इतकं की…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट ।। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबई-ठाण्यातून दरवर्षी मोठ्या संख्येने गणेशभक्त कोकणात जात असतात. सण-उत्सवादरम्यान प्रवास हा मोठा गहन प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो.

राखीपोर्णिमेलाही मुंबई, ठाणे आणि पुण्यात ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. प्रवाशांना दरवर्षी मोठा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, यंदाही मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांची चाळण आहे. त्यामुळे प्रवासाला अतिरिक्त वेळ लागणार हे निश्चित. अशावेळी कोकणात बाप्पाच्या उत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांचा अधिकांश वेळ हा प्रवासातच फुकट जातो.

कोकणात बाप्पासाठी लवकरच पोहोचता यावं म्हणून अनेकजण विमानाने प्रवास करतात. वाहतूक कोंडीत अडकण्यापेक्षा विमानाने सुसाट पोहोचता येईल अशी आशा असते. मात्र सध्या कोकणात जाणं हे थायलंड, सिंगापुर किंवा दुबईला जाण्यापेक्षाही महाग झालं आहे.

दुबईला जाण्यासाठी सर्वात स्वस्त विमानाचे तिकीट १३ हजारांवर आहे. स्पाईस नेट १६ हजार तर एअर इंडियाचं तिकीट १८ हजारांहून अधिक आहे. २६ ऑगस्ट रोजी, गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी स्पाईस जेटचे मुंबई-गोवा विमानाचे तिकीट २१ हजारांपर्यंत पोहोचलं आहे. एरवी ३ हजारांवर असलेलं विमान तिकीट आता थेट सात पटीने वाढून थेट २१ हजारांवर पोहोचलं आहे. त्यामुळे कोकणात जाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी गणेशभक्तांना अन्डच्या सव्वा पैसे मोजावे लागणार आहे.

२६ आणि २७ ऑगस्ट दरम्यान विमानाचे तिकीट १९ ते २१ हजारांपर्यंत पोहोचलं आहे. यामध्ये काही तिकीटं ही ४ हजार, ७ हजार किंवा १० हजारों दरम्यानही आहेत. सर्वसाधारणपणे मुंबईहून मोव्याला विमानाने जायला १ तास २० मिनिटं इतका वेळ लागती. मात्र स्वस्त तिकीटांमध्ये दोन ते चार तासांचा थांबा देण्यात आला आहे. मुंबई ते गोवा प्रवासादरम्यान ४ तासांचा थांबा आहे. त्यामुळे मुंबईहुन विमान निघाल्यानंतरही हैद्राबाद किया इतर ठिकाणी चार ते पाच तास थांबावं लागणार आहे. एअर इंडियाच्या काही फ्लाइटमध्ये यांच्यासाठीचा वेळ २१ तासांपर्यंत गेल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *