महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट ।। अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे, सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावणार असं म्हटलं होतं, मात्र त्यानंतर भारत रशियाकडून तेल आयात करतो म्हणून भरतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता येत्या 28 ऑगस्टापासून भारतीय वस्तुंवर तब्बल 50 टक्के इतका टॅरिफ लावला जाणार आहे. यावरून चीनने आक्रमक भूमिका घेतली होती. टॅरिफच्या मुद्द्यावरून भारताला समर्थन देताना चीनने अमेरिकेला चांगलंच सुनावलं होतं. मात्र आता चीनने भारतासोबत डबल गेम खेळल्याचं समोर आलं आहे.
एकीकडे टॅरिफच्या मुद्द्यावरून चीनने भारताचं समर्थन करत अमेरिकेला सुनावलं, तर दुसरीकडे मात्र चीनने भारताच्या शत्रू राष्ट्राची मोठी मदत केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार चीनने पाकिस्तानला लढावू पाणबुड्या दिल्या आहेत. तर दुसरीकडे चीनने इस्रायलचा शत्रू असलेल्या इराणला देखील मिसाइल दिल्या आहेत, याबाबत इस्रायलचे वृत्तपत्र असलेल्या येदिओथ अहरोनोथच्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे.
या रिपोर्टनुसार चीन आणि इराणमध्ये झपाट्यानं सैन्य मदत करार वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं होतं. या युद्धामध्ये इराणचं मोठं नुकसान झालं मात्र आता चीनच्या मदतीने पुन्हा एकदा इराण आपली मिसाईल शक्ती वाढवून आपल्यावर हल्ल करू शकतो अशी भीती इस्रायला वाटत आहे. चीनने अद्याप या गोष्टीचा स्वीकार केलेला नाही, मात्र वृत्त फेटाळून देखील लावलं नाही.
दरम्यान चीन सध्या इराणची मदत तर करतच आहे, मात्र दुसरीकडे भारतासाठी कायम डोकेदुखी ठरलेल्या पाकिस्तानसाठी देखील चीनने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. चीनकडून पाकिस्तानला शस्त्रांची आयात सुरू आहे. त्यातच आता अशी बातमी समोर आली आहे की, चीनने पाकिस्तानला आठ अद्यावत हेंगोर-क्लास पाणबुड्यांचा पुरवठा केला आहे, ज्यामुळे पाकिस्तानी नौवदलाच्या ताकद कैकपटीनं वाढली आहे. हा भारताला चीनकडून मोठा धक्का आहे. एकीकडे टॅरिफच्या मुद्द्यावरून चीनने अमेरिकेला सुनावलं, मात्र त्याचवेळी पाकिस्तानची देखील मदत केली आहे.