महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑगस्ट ।। पुणे-मुंबई मार्गावरील सात एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. जोरदार पावसामुळे या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. 3 एक्सप्रेस ट्रेनचा प्रवास अर्ध्यात थांबवला जाणार असल्याचं रेल्वेनं जाहीर केलं आहे. पुण्यातील पावसाचे अपडेट्स आणि रद्द झालेल्या ट्रेन कोणत्या ते पाहूयात…
कोणत्या ट्रेन रद्द?
मुंबईकडे येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या ट्रेन पुण्यामध्येच रद्द करण्यात आल्या आहेत. पावसामुळे हा निर्णय घेतल्याचं रेल्वेनं जाहीर केलं आहे. यासंदर्भातील माहिती अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आली आहे. मुंबईमध्ये आज म्हणजेच बुधवारीही रेल्वे वाहतुकीला पावसाचा काही प्रमाणात फटका बसल्याचं दिसत आहे. पश्चिम रेल्वे सकाळच्या सत्रात सुरक्षित धावत आहे. मध्य रेल्वे 15 मिनिटं उशिराने धाव आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक 10 मिनिटं उशीराने सुरु आहे. पुणे आणि नाशिक मार्गावरील रद्द करण्यात आलेल्या ट्रेन कोणत्या ते पाहूयात…
पुणे-नाशिक मार्गावरील रद्द झालेल्या ट्रेन्सची यादी खालीलप्रमाणे :