Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान भिडणार ; केंद्र सरकारकडून शिक्कामोर्तब ? फक्त अट एकच…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट ।। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध हे अधिक ताणले गेले आहेत.त्यानंतर भारत आणि पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यात कोणताही क्रिकेट सामना खेळला जाऊ नये अशी मागणी केली जात होती. यानंतर आता भारत सरकारच्या खेळ मंत्रालयाने नवीन धोरण लागू केलं असून भारत – पाक सामन्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याअंतर्गत भारत कोणत्याही द्विपक्षीय सीरीज किंवा इव्हेंटमध्ये पाकिस्तान सोबत खेळणार नाही परंतू आंतरराष्ट्रीय सामने आणि स्पर्धांमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळण्यापासून टीम इंडियाला (Team India) रोखलं जाणार नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की, खेळ मंत्रालयाने आशिया कपमध्ये होणाऱ्या भारत – पाकिस्तान सामन्याला हिरवा कंदील दाखवला आहे आणि या सामन्याबाबत सरकारला कोणतीही आपत्ती नाही.

पाकिस्तान विरुद्ध नाही खेळणार भारत :
भारत सरकारच्या खेळ मंत्रालयाकडून 20 ऑगस्ट रोजी एक स्टेटमेंट जाहीर करण्यात आलं ज्यात म्हटलं गेलं की, ‘भारत कोणतीही द्विपक्षीय सीरिज खेळण्यासाठी पाकिस्तानात जाऊ शकत नाही. तसेच भारत सरकार सुद्धा पाकिस्तानच्या संघाला भारतात येऊन खेळण्याची परवानगी देणार नाही. कोणत्याही द्विपक्षीय सीरिजमध्ये भारत आणि पाकिस्तान संघात सामने होणार नाहीत. परंतु कोणत्याही भारतीय खेळाडूला किंवा संघाला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून रोखले जाणार नाही, जरी पाकिस्तानी संघ किंवा खेळाडू त्यात सहभागी होत असले तरीही.

काय आहे भारत सरकारचे उद्दिष्ट?
जारी केलेल्या दस्तऐवजात असेही म्हटले आहे की भारत सरकारचे उद्दिष्ट देशाला अधिकाधिक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी तयार करणे आहे. परदेशी खेळाडू आणि संघांना भारतात येण्यासाठी जास्त अडचणी येऊ नयेत म्हणून सरकार प्रक्रिया सोपी करण्यावर भर देत आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांसाठी व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे, ज्यांना 5 वर्षांपर्यंत व्हिसा मिळू शकेल. आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांशी संबंध सुधारण्यासाठी असे करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *