Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ ऑगस्ट ।। पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून गेल्या बुधवारी म्हणजेच २० ऑगस्ट रोजी मित्रांसह फिरायला आलेल्या गौतम गायकवाड हा तरुण अचानक बेपत्ता झाला होता. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांकडून त्या बेपत्ता तरुणाचा सातत्याने शोध घेतला जात होता. अखेर किल्ल्यावरून गायब झालेला तो तरुण सापडला आहे. गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असेल्या गौतम गायकवाडचा शोध लागला असून पुणे पोलिसांनी CCTV मार्फत त्याला शोधलं आहे. रविवारच्या संध्याकाळच्या सुमारास गौरव सापडला असून त्याला उपचारासाठी सध्या रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्याच्या चौकशीनंतर चार दिवसांत तो कुठे गेला होता, कसा गायब झाला होता ते समजू शकणार आहे.

पावसामुळे शोधकार्यात येत होत्या अडचणी
पुणे ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गिर्यारोहकांनीही गौतमचा शोध सुरु केला पण सिंहगड भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्याने मागचे चार दिवस त्याचा शोध लागला नाही. सिंहगडावरुन तो बेपत्ता झाल्याचं त्याच्या कुटुंबालाही कळवण्यात आलं होतं. तसंच हवेली पोलीस ठाण्यात गौतम हरवल्याची तक्रारही नोंदवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. जेव्हा त्यांना सिंहगडाच्या पायथ्याशी गौतम गायकवाड आहे हे आढळून आलं. गौतम गायकवाड कॅमेरापासून लपत होता तेव्हाच तो कॅमेरात कैद झाला असंही पोलिसांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. रविवारी संध्याकाळी पोलिसांना गौतम दिसला. तातडीने त्याला शोधण्यात आलं. त्याला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आम्ही त्याची चौकशी करु त्यानंतर तो कुठे गेला होता आणि का गायब झाला होता हे आम्हाला सांगता येईल अशी माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगाडे यांनी दिली.

तरुणाने जाणून-बुजून बेपत्ता होण्याचा कट रचला?
दरम्यान, बेपत्ता झालेला गौतम सीसीटीव्हीमध्ये दिसत असेल आणि पोलिसांना सापडत नसेल तर हा सगळा प्रकार तरुणाने जाणून-बुजून केला असल्याचा संशय पोलिसांना आला. हवेली पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार देण्यात आली होती. २४ वर्षांचा गौतम गायकवाड हा साताऱ्याचा असून, गेल्या पाच दिवसांपूर्वी तो मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर फिरायला आला होता. तानाजी कड्यावरून तो पाय घसरून तो दरीत पडल्याचे त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले होते. तेव्हापासून पुणे ग्रामीण पोलीस, हवेली पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके त्याचा शोध घेत होते. पण तेव्हा त्याचा शोध लागलेला नाही. मात्र अखेर या तरुणाचा शोध लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *