Gold Rate Today : ग्राहकांच्या खिशाचा भार कमी; 10 ग्रॅम सोन्याचा दर पहा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ ऑगस्ट ।। आज सोन्याचा आणि चांदीचा भाव बदलेला दिसत आहे. सोन्याचा आणि चांदीच्या किमतीत दररोज वेगळे बदल दिसतात. आज सोन्याच्या किमतीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. आज सोन्याचा भावात 600 रुपयांनी बदल दिसत आहे.   सोन्याची दरवाढही थांबली आहे.  सोन्याच्या दरात उतरती कळा पाहायला मिळाली.

आज,   25 जुलै रोजी सोने आणि चांदीचा भाव त्यांच्या उच्चांकी पातळीवरून खाली आला आहे. आज सोने 600 रुपयांपर्यंत घसरले आहे. 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत सुमारे 1,00,480 रुपयांवर आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 92,100 रुपयांच्या वर आहे. सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत 500 रुपयांनी बदल जाणवला आहे. चांदीचा दर 1,18,000 रुपयांवर व्यवहार करत आहे. आज सकाळी MCX वर, सोन्याचा भाव हा 98,553 रुपये आहे.

आज सोने आणि चांदी का घसरली?
किमती घसरण्याचे पहिले प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेने जपान आणि फिलीपिन्ससोबत नवीन व्यापार करार केला आहे. यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांना असे वाटू लागले आहे की आता बाजारातील तणाव कमी करता येईल आणि भविष्यात युरोप किंवा चीनसोबतही असे करार करता येतील. जेव्हा वातावरण स्थिर दिसते तेव्हा लोक सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीतून पैसे काढू लागतात आणि शेअर बाजारासारख्या धोकादायक गुंतवणुकीकडे वळतात. या नफा बुकिंगमुळे सोन्याची मागणी थोडी कमी झाली, ज्यामुळे किंमतींमध्ये घसरण झाली.

दुसरे कारण म्हणजे आता जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेच्या आर्थिक आकडेवारीवर आणि मध्यवर्ती बँकांच्या निर्णयांवर आहे. येत्या काळात अमेरिकेतील बेरोजगारीचा डेटा आणि युरोप आणि अमेरिकेतील व्याजदरांवरील निर्णयांचा बाजारावर मोठा परिणाम होऊ शकतो. जर या आकडेवारीवरून असे दिसून आले की अर्थव्यवस्था मजबूत होत आहे, तर गुंतवणूकदार सोने विकू शकतात आणि इतर पर्याय निवडू शकतात. यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *