महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ ऑगस्ट ।। विकी कौशलच्या छावा सिनेमा ब्लॉकब्लस्टर ठरला. संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांनी या सिनेमाला डोक्यावर उचलून धरले. विकी कौशलने साकारलेली छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका सर्वांनाच भावली. अलीकडेच छावा सिनेमा टी्व्हीवर दाखवण्यात आला. तेव्हा छावा सिनेमातील डिलीट केलेले काही सीन्स टिव्हीवर दाखवण्यात आले. छावा सिनेमा रिलीज झाला तेव्हा काही सीन्स वगळण्यात आले होते. मात्र दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी छावा सिनेमातील डिलीट केलेले सीन्स टिव्हीवर दाखवले.
छावा सिनेमातील असाच एक डिलीट केलेला सीन समोर आला आहे. यात शंभूराजे आणि औरंगजेब समोरा समोर येतात. छावामधून डिलीट करण्यात आलेला एक सीन विकी कौशलच्या एका फॅन पेजने शेअर केला आहे. यात छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब एकमेकांसमोर असतात. सोशल मीडियावर हा सीन तुफान गाजतोय.
डिलीट केलेल्या या सीनमध्ये शंभूराजे त्यांचं हिंदुस्थानाबद्दल किती प्रेम आहे हे औरंगजेबाला सांगतात. राजा तो असतो जो संपूर्ण देश स्वतःच्या मुठीत ठेवतो, असं औरंगजेब शंभूराजेंना सांगतात. त्यावर मला माझा हिंद प्रांत माझ्या मुठीत ठेवायचा नाहीये तर स्वतंत्र बघायचाय, असं प्रतिउत्तर देऊ शंभूराजे देतात. हा जबरदस्त सीन पाहून नेटकऱ्यांनी या सीनला पसंती दिली आहे.