महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑगस्ट ।। देशभरात गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. गणेशोत्सवासाठी लाखो कोकणवासीय आपापल्या गावी जायला निघाले आहेत. गणपतीनिमित्त अनेक ठिकाणी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.गणेशोत्सवाच्या काळात बँकांनादेखील सुट्ट्या आहेत. त्यामुळे जर या काळात तुमचे बँकेत काही काम असेल तर आधीच सुट्ट्यांची यादी बघून जा.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये २५ ते ३१ ऑगस्टमध्ये बँका अनेक दिवस बंद असणार आहेत. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे सण आहेत. याचसोबत वीकेंडची सुट्टी असणार आहे. बँकांना किती दिवस सुट्ट्या असणार आहेत ते जाणून घ्या.
किती दिवस बँका बंद? (Bank Holidays)
सोमवार (२५ ऑगस्ट)- गुवाहाटीमध्ये बँकांना सुट्ट्या असणार आहेत.त्रिभव तिथी ऑफ श्रीमंता संकरदेवानिमित्त बँका बंद असणार आहेत.
ऑगस्ट २७ (बुधवार)- २७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवानिमित्त अनेक राज्यांमध्ये सुट्ट्या असणार आहेत. अहमदाबाद, बेलापूर, मुंबई आणि नागपूर, बंगळुरु, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, पणजी, विजयवाडा या ठिकाणी सुट्टी असणार आहे. गणेश चतुर्थीनिमित्त सुट्ट्या असणार आहेत.
ऑगस्ट २८-भुवनेश्वर (ओडिशा) आणि पणजीमध्ये बँकांना सुट्ट्या असणार आहेत.
ऑगस्ट ३१(रविवारी)- रविवारी सर्व बँकांना सुट्टी असणार आहे.
याचसोबत शेअर मार्केटदेखील बंद असणार आहे. बीएसई आणि एनएसई २७ ऑगस्ट रोजी बंद असणार आहे. गणेश चतुर्थीनिमित्त शेअर मार्केटमध्ये सुट्ट्या असणार आहे. या दिवशी बँका बंद असणार आहेत. परंतु एटीएम कार्ड, मोबाईल बँकिंग, एटीएम, यूपीआय या सुविधा सुरु असणार आहेत.