Ration Card Holder: राज्यातील 3 हजार रेशन कार्डधारकांना नाही मिळणार रेशन; हे आहे कारण?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ ऑगस्ट ।। तुमच्याकडे रेशनकार्ड आहे, पण तुम्ही त्याचा उपयोग रेशन घेण्यासाठी नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सरकारनं रेशन न घेणाऱ्याबाबत मोठा निर्णय घेतलाय. जानेवारी ते जून या कालावधीत रेशन दुकानातून धान्य घेतले नाहीत. त्याच्या धान्य वाटपावर बंदी करण्यात येणार आहे. दरम्यान केंद्र सरकारकडून अपात्र लाभार्थ्यांची यादी राज्यांना पाठवण्यात आली आहे.

दरम्यान सहा महिन्यात रेशन दुकानात धान्य न घेणाऱ्यांचं त्यांचे धान्य वाटप तात्पुरते बंद करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील ३,०९७ शिधापत्रिकाधारकांनी जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत रेशन दुकानातून धान्य उचलले नाही, म्हणून त्यांचे धान्य वाटप बंद करण्यात आलंय. शहरातील रेशन विभाग तीन झोनमध्ये विभागलेला आहे.

अ (निगडी), ज (पिंपरी) आणि फ (भोसरी) एकूण ४,८९ ,३८७ लाभार्थ्यांना रेशनचा लाभ दिला जातोय. यातील ३,७१० अत्याधुनिक योजना लाभार्थी आणि ८८,६४१ शिधापत्रिकाधारक अन्न सुरक्षा योजनेतील आहेत. दरम्यान प्रशासनाचा खरा हेतु हा खऱ्या गरजू लाभार्थ्यांना मोफत रेशनचा लाभ मिळवून देणे आहे.

‘ज’ झोनमधील अपात्र लाभार्थ्यांची अंतिम पडताळणी सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तींच्या नावावरून धान्य वाटप कायमस्वरूपी थांबविले जाणार आहे. तसेच नवीन पात्र लाभार्थींची निवड सातत्याने सुरू आहे. जानेवारी ते जून या कालावधीत धान्य न उचलणाऱ्या लाभार्थ्यांच्या जागी अपंग, निराधार, विधवा आणि गरजू नागरिकांना रेशनचा लाभ दिला जातोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *