Priya Marathe Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ ऑगस्ट ।। पवित्र रिश्ता या प्रसिद्ध टिव्ही मालिकेत उत्तम कामगिरी करणाऱ्या प्रिया मराठे यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी चार वाजता मीरा रोड येथे कर्करोगाने निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचे वय 38 वर्ष होते. संध्याकाळी चार वाजता अंतिम संस्कार होणार आहे अशी माहिती मिळाली आहे.

प्रिया मराठे यांनी नाटक, मालिका, चित्रपट सर्व माध्यमांवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. सकारात्मक , ऐतिहासिक,नकारात्मक भूमिका तिने सुंदर पद्धतीने साकारल्या आहेत. आतापर्यंत तिने अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकेत उत्तम भूमिका साकारली आहे.

प्रिया मराठे यांनी या सुखांनो या, चार दिवस सासूचे, तू तिथं मी, संभाजी, येऊ कशी मी नांदायला, तुझेच गीत गात आहे यासारख्या घराघरात पोहोचलेल्या मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच पवित्र रिश्ता, उतरन, कसम से, बडे अच्छे लगते है यासारख्या हिंदी मालिकांमध्ये देखील उत्तम काम केले आहे.

प्रियाने पवित्र रिश्ता या प्रसिद्ध मालिकेत प्रियाने ‘वर्षा’ नावाच्या बहिणीची भूमिका साकारली होती. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्यावर आधारित मालिकेत गोदावरी ही सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली होती. तसेच जीजामाता मालिकेतही काम केले होते. यामध्ये तिने रायबागन भूमिका साकारली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *