महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ०७ सप्टेंबर | Gold-Silver Price Today: सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. जीएसटी परिषदेच्या ५६ व्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले, ज्याचा थेट परिणाम बाजारावर दिसून येत आहे. या बैठकीनंतर देशभरात सोन्याच्या किमतीत बदल झाले आहे. अशातच आज, ०७ सप्टेंबर २०२५ रोजी, रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ०७ सप्टेंबर २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १०८,१३० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ९९,११९ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १२४,५३० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,२४५ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…
तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९८,९३६ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत १०७,९३० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९८,९३६ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १०७,९३० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९८,९३६ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १०७,९३० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९८,९३६ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १०७,९३० रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)