महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ०८ सप्टेंबर | टॅरिफनंतर अमेरिकेने व्हिसाच्या निमयात बदल करत भारताला आणखी एक धक्का दिला आहे. नॉन-इमिग्रेंट व्हिसाच्या नियमात (NIV) बदल केल्याचा थेट परिणाम लाखो भारतीयांवर होणार आहे. व्हिसासाठी अर्ज करणारे भारतीय एनआयव्ही मुलाखत फक्त आपल्याच देशात देणार आहे. विदेशात जाऊन लवकर अपॉइंटमेंटचा विकल्प बंद करण्यात आला आहे.
अमेरिकेने नॉन इमिग्रेंट व्हिसा (NIV) नियमांत बदल केल्याचा परिणाम अनेकांवर होणार आहे. व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना आता मुलाखतीसाठी नागरिकता असलेल्या देशाचा पर्याय निवडावा लागणार आहे. या बदलाचा परिणाण अनेकांवर होणार आहे. लवकर व्हिसा मिळवण्यासाठी अनेकजण थायलंड, सिंगापूर अथवा जर्मनीसारख्या देशांत जात होते. अनेक भारतीय विदेशात जाऊन B1 (बिजनेस) अथना B2 (टूरिस्ट) व्हिसा मुलाखत देत होते. अमेरिकेने हा पर्याय सध्या बंद केला आहे.
कोरोना काळात दिलासा –
कोरोना काळात भारतामध्ये व्हिसा मुलाखती लवकर होत नव्हत्या. दोन तीन वर्षांपर्यंत वेळ लागत होता. त्यावेळी भारतामधील अर्जदारांनी विदेशात जाऊन अमेरिकेच्या व्हिसासाठी मुलाखत देत होते. ट्रॅव्हल एजेंट्सनुसार, अनेकजण बँकॉक, सिंगापूर, प्रँकफर्ट, ब्राजील, थायलंड या ठिकाणी अनेकांनी व्हिसाच्या मुलाखती दिल्या. मुलाखत दिल्यानंतर पासपोर्ट मिळताच ते भारतात परत येत होते.
नव्या नियमांचा किती प्रभाव?
टूरिस्ट, बिजनेस, विद्यार्थी, अस्थायी वर्कर्स आणि अमेरिकेत जाऊन लग्न कऱणाऱ्यांवर याचा परिणाम होणार आहे.
व्हिसा मुलाखतीसाठी भारतात किती वेळ लागतो?
अमेरिका विदेश मंत्रालयच्या संकेतस्थळानुसार, भारतामध्ये NIV मुलाखतीसाठी प्रत्येक शहरात वेगवेगळा वेळ लागतोय.
हैदराबाद आणि मुंबई: 3.5 महिने
नवी दिल्ली: 4.5 महीने
कोलकाता: 5 महीने
चेन्नई : 9 महीने
ट्रम्प प्रशासनाचे कठोर नियम
डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी व्हिसा नियम अधिक कठोर केले. २ सप्टेंबरपासून नवीन नियम लागू कऱण्यात आला आहे. NIV अर्जदारांना, कोणतेही वय असले तरीही काउंसलर मुलाखत द्यावीच लागेल.
कोणाला मिळणार सूट?
B1, B2 व्हिसाची मागील वर्षभरात मुदत संपली आहे, त्याचं वय १८ वर्षांपेक्षा जास्त असेल तर मुलाखतीत सूट मिळू शकते.