आयुष कोमकरच्या मारेकऱ्यांना बेड्या, बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक, मास्टरमाईंड फरार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ०९ सप्टेंबर | पुण्यामध्ये आयुष कोमकर हत्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा गँगवारची जोरदार चर्चा सुरू झाली. वातावरण तापल्यानंतर पुणे पोलीसही अॅक्शन मोडवर आलेय. पुणे पोलिसांनी आयुष कोमकरच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुणे पोलिसांनी बुलढाण्यातून मध्यरात्री बेड्या ठोकल्याचे समोर आले आहे. यामध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर सह सहा जणांचा समावेश आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल रात्री उशीरा अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीच्या ६ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा जणांच्या मुसक्या आवळल्या. अटक करण्यात आलेल्या सहा संशयितांमध्ये अंधेकरांच्या कुटुंबातील चार लोक आहेत आणि दोन बाहेरचे असल्याचेही समोर आलेय. सध्या या आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. या सर्वांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे.

आयुष कोमकर हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा होता. शुक्रवारी नाना पेठेत दोन तरुणांनी त्याच्यावर गोळीबार करत खून केला. विसर्जनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती. यानंतर पुणे पोलिसांनी वनराजचे वडील सूर्यकांत आंदेकर यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. २ दिवसांपूर्वी याच प्रकरणातील २ जणांना अटक करण्यात आली होती. काल रात्री उशिरा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सूर्यकांत आंदेकर यासह इतर जणांना बुलढाणा जिल्ह्यातून ताब्यात घेतलं.

बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या मेहकर तालुक्यापासून जवळ असलेल्या एका गावाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी सापळा रचून या संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पुणे पोलिसांनी बुलढाण्यातून सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी निलंजय वाडेकर असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. आज सर्वांना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *