महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १० सप्टेंबर | लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सप्टेंबर महिन्याचे सुरुवातीचे १० दिवस उलटून गेले आहेत तरीही अद्याप ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सप्टेंबर हप्ता सुरु झाला तरी ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या हप्त्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्नदेखील विचारला जात आहे.
लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.याआधी जेव्हा कोणत्याही महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला आहे तेव्हा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा झाले आहे.परंतु या महिन्यात दोन्ही महिन्याचे हप्ते अजूनपर्यंत आलेले नाहीत. आतापर्यंत ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा व्हायला हवा होता. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे.
लाडकी बहिण योजनेत जर महिलांना लवकरच हप्ता मिळणार आहे. नवरात्रीत हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. परंतु याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दर महिन्यात सणासुदीचा मूहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात.त्यामुळे या महिन्यातदेखील नवरात्रीत पैसे दिले जाण्याची शक्यता आहे.