महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १० सप्टेंबर | सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. गणेशोत्सवाच सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. त्यानंतर आजदेखील सोन्याचे दर वाढले आहे. सोन्याचे दर आज १ लाख १० हजार रुपयांवर गेले आहे. सोन्याचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर असेच वाढत राहिले तर सोनं खरेदी करावे की नाही असा प्रश्न आता ग्राहकांना पडला आहे.आजदेखील सोन्याचे दर वाढले आहेत.प्रति तोळ्यामागे २१९ रुपयांनी वाढ झाली आहे.
सोन्याचे दर वाढले (Gold Rate Increases)
सोन्याचे दर आज प्रति तोळ्यामागे २१९ रुपयांनी वाढले आहेत. सोन्याचे दर आज १,१०,५०९ रुपये झाले आहेत. सोन्याचे दर ८ ग्रॅममागे १७५ रुपयांनी वाढले आहेत. हे दर ८८,४०७ रुपये झाले आहेत. १० तोळे सोन्याचे दर ११,०५,०९० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे २,१९० रुपयांनी वाढ झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)
आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २०० रुपयांनी वाढले आहेत. २२ कॅरेट सोन्याचे दर आज १,०१,३०० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे १६० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅमचे दर ८१,०४० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याच्या दरात २००० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १०,१३,००० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)
आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात १ तोळ्यामागे १६० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर ८२,८८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे १२८ रुपयांनी वाढ झाली असून हे दर ६६,३०४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १६०० रुपयांनी वाढले आहेत. १० तोळ्याचे दर ८,२८,८०० रुपये झाले आहेत.
सोन्याचे दर असेच वाढत राहणार
सोन्याचे दर यापुढेही असेच वाढत राहणार असल्याचे सांगितले जात आहे. सोन्याचे दर १ लाखांच्या पार गेले आहेत. पुढच्या काही दिवसांत सोन्याचे दर सव्वा लाखापार जाऊ शकतात, असंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे इथून पुढे सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नसणार आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला खूप फटका बसणार आहे.