महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १० सप्टेंबर | मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत ऑगस्टमध्ये धुमाकूळ घालणारा पाऊस सप्टेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच काहिशी विश्रांती घेणारा पाऊस पुन्हा धो- धो बरसणार आहे. भारतीय हवामान खात्यानं तसा अंदाज वर्तवला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, देशातील २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गुरुवारी, ११ सप्टेंबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यात ओडिशा, अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, सिक्किम, तमिळनाडू, पुद्दूचेरी, तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे.
IMD Weather Alert: Rainfall over Northeast India (September 10–16)
States: Arunachal Pradesh, Assam, Meghalaya, Nagaland, Manipur, Mizoram & Tripura
Stay tuned for more weather updates: https://t.co/wV5bB4mJZ8#WeatherUpdate #IMD #Rainfall #thunderstorm #ArunachalPradesh… pic.twitter.com/rOkkCvxy6q
— India Meteorological Department (@Indiametdept) September 10, 2025
ओडिशाच्या विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पाऊस : अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेशचा किनारी प्रदेश, मध्य प्रदेशचा पूर्वेकडील भाग, उत्तर प्रदेशचा पूर्वेकडील परिसर, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, कर्नाटकाचा उत्तरेकडील भाग, पश्चिम बंगाल आणि सिक्किम, तमिळनाडू, पुद्दूचेरी, तेलंगणा आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज.
अंदमान आणि निकोबार, बिहार, कर्नाटकचा काही भाग, झारखंड, ओडिशा, तमिळनाडू, पुद्दूचेरी, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि सिक्किमच्या काही भागांत ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे वारे आणि विजांसह पावसाचा अंदाज आहे.
आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि उत्तराखंड आदी राज्यांतील काही भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.