महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १७ सप्टेंबर | पुणे-पौड-कोलाड राष्ट्रीय महामार्गावरील भूगाव येथील बाह्यवळण रस्त्याचे (Bhugaon Bypass Road) गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले काम अखेर मार्गी लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) पुढील नऊ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
या रस्त्याच्या कामामुळे पुणे (Pune) शहरातील हिंजवडी, पिरंगुट तसेच कोकणमार्गे प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. वाहतूक कोंडीची समस्या दूर होऊन प्रवासाचा वेळही वाचणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही वर्षांपासून भूगाव बाह्यवळण रस्ता रखडल्याने वाहतुकीची समस्या गंभीर झाली होती. मात्र, आता गडकरी यांच्या हस्तक्षेपामुळे प्रकल्पाला गती मिळाल्याने अपेक्षित दिलासा मिळण्याची शक्यता आहे.