महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १९ सप्टेंबर | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बार फुटणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया ३ टप्प्यामध्ये पार पाडण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे नियोजन आहे. सध्या राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये मुंबईसह राज्यातील सर्व महानगर पालिकेचा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.