महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २४ सप्टेंबर |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
तिखट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा. दुसर्यावर हुकूमत गाजवू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. कुटुंबा समवेत वेळ उत्तमपणे घालवाल. जुन्या मित्राची अचानक गाठ पडेल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
कामाच्या ठिकाणी मानाचा दर्जा मिळेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवून वागावे. जुनी कामे प्राधान्याने पूर्ण करा. व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींचा दिनक्रम व्यस्त राहील. भागीदारीच्या बाबतीत सारासार विचार करा.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
हट्टीपणे वागू नका. बुद्धिमत्तेचे दर्शन घडवा. अनेक कामे हातावेगळी कराल. मात्र घाईने समस्या ओढवून घेऊ नका. कामाचा प्राधान्यक्रम लक्षात घ्या.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
भागीदारीत फायदा होईल. खेळ आणि आरामात बराच काळ घालवाल. अनेक कामे अंगावर पडू शकतात. जबाबदार्यांचा ताळमेळ सांभाळावा. शक्यतो वादविवादात पडू नका.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
दुसर्यास समजून सांगण्याची हातोटी निर्माण कराल. निराशेचे बळी होऊ नका. वाहनाची समस्या उद्भवू शकते. प्रतिकूलतेत संयम बाळगावा. कुटुंबात मान सन्मान प्राप्त होतील.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. परिस्थितीचा आढावा घेऊन काम करा. कौटुंबिक जबाबदार्यांकडे दुर्लक्ष करू नका. अति कामाचा थकवा जाणवेल. आरोग्याची काळजी घ्यावी.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
इतरांशी व्यवहाराने वागाल. समस्यांचे निराकरण सक्षमतेने कराल. निराश न होता परिस्थिती हाताळा. कामावर लक्ष केन्द्रित करावे. प्रिय व्यक्तीचा रूसवा दूर करावा लागेल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
अति साहस करू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. दुसर्याची मानसिकता समजून घ्या. जबाबदारी पार पडताना थकून चालणार नाही. खर्चात वाढ होण्याची शक्यता.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
तुमच्या प्रेमळ स्वभावाचा गैर फायदा घेऊ देऊ नका. तुमच्या शक्तीची लोकांना कल्पना येईल. घरातील अतिरिक्त कामे अंगावर पडतील. नियोजनाने वाटचाल करावी. रागावर नियंत्रण ठेवा.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
शांतता व संयम बाळगा. आत्मविश्वास वाढीस लागेल असे काम करा. दिवस मनाजोगा घालवाल. काही कामे नाईलाजाने करावी लागतील. स्वयंपाक करताना खबरदारी घ्यावी.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
गूढ गोष्टींबद्दल आवड वाटेल. नवीन लोकांशी मैत्री कराल. सकारात्मक विचार करावेत. मनाच्या चंचलतेला आवर घालावी. प्रवासात सावधानता बाळगा.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
दिवस उत्साहात व आनंदात जाईल. अचानक धनलाभाचे योग. जोडीदाराची प्रगति होईल. परदेशात जाण्याची संधी चालून येईल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च कराल.