महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २४ सप्टेंबर | सप्टेंबर महिन्याच्या या आठवड्यातील २२ सप्टेंबर रोजी अनेक भागातील बँका बंद होत्या. राजस्थानच्या जयपूरमध्ये बँका या घट स्थापनेच्या पार्श्वभूमीवर बंद होत्या. तर तेलंगणामध्ये पुष्प उत्सव, बथुकम्माच्या निमित्त बँकांना सुट्टी होत्या.
मंगळवारी, २३ सप्टेंबर रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये महाराजा हरि सिंह यांच्या जयंतीनिमित्त बँका बंद होत्या. हरियाणामध्ये स्थानिक वीरांच्या स्मृतीदिनानिमित्त शहीद दिनानिमित्त बँका बंद होत्या.
आरबीआयच्या आदेशानुसार, देशभरातील बँक २७ सप्टेंबर रोजी बंद असणार आहे. महिन्यातील चौथा शनिवार असल्याने या बँका बंद असणार आहेत. तर २८ सप्टेंबर रोजी रविवार असल्याने बँका बंद असणार आहेत. रविवारच्या दिवशी देशभरातील बँक असणार आहेत.
सलग सुट्ट्यांमुळे बँकेत चेक जमा करणे, खात्यातून पैसे काढणे, कर्जासाठी अर्ज करणे या सेवेसाठी बँकेच्या शाखेत जाण्यासाठी आधीच नियोजन करावे लागेल. तसेच बँकांच्या सुट्ट्या पाहून ग्राहकांना नियोजन करावे लागेल.
ग्राहकांना बँकेतून पैसे काढण्याविषयी चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही युपीआय, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, एटीएमच्या माध्यमातून पैसे काढू शकता. त्यामुळे पैसे काढणे आणि पैसे पाठवणे या सारख्या सेवेचा लाभ तुम्हाला घेता येईल.
बंपर सुट्ट्यांमुळे चेक क्लिअर करणे, कर्जाची प्रक्रिया किंवा अन्य बँकांची कामे लांबणीवर पडणार आहेत. त्यामुळे ग्राहक किंवा कंपन्यांनी बँकांशी संबंधित कामे आधीच करणे गरजेचे आहे.
बँकांच्या सुट्ट्या
22 सप्टेंबर – घट स्थापना (राजस्थान)
23 सप्टेंबर – महाराजा हरि सिंह जयंती (जम्मू-काश्मीर)
29 सप्टेंबर – महासप्तमी/दुर्गा पूजा (त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगाल राज्य)
30 सप्टेंबर – महाअष्टमी/दुर्गा अष्टमी/दुर्गा पूजा (त्रिपुरा, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मणिपूर, राजस्थान
सलग सुट्ट्या –
त्रिपुरा, आसाम आणि पश्चिम बंगाल राज्यामध्ये २८ ते ३० सप्टेंबर महिन्यात सलग 3 दिवस बँका बंद राहणार आहेत.
28 सप्टेंबर – रविवार
29 सप्टेंबर – महासप्तमी
30 सप्टेंबर – महाअष्टमी/दुर्गा पूजा