उन्हाळी सुट्ट्यांसाठी रेल्वेची खास तयारी! १,४८४ विशेष गाड्या धावणार

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ मार्च २०२६ ।। उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन Central Railway ने १,४८४ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्यांपैकी ७४९ आरक्षित तर ७३५ अनारक्षित गाड्या असणार आहेत. सुट्ट्यांमध्ये प्रवाशांना आपल्या कुटुंबीय व नातेवाईकांकडे सहज प्रवास करता यावा, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी Mumbai/DaundSolapur, PuneKolhapur, Nashik रोड – Badnera तसेच HadapsarHarangul या मार्गांवर विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्राबाहेरील प्रवासासाठीही काही महत्त्वाच्या मार्गांवर विशेष गाड्या धावणार आहेत. यात MumbaiBallia, MumbaiGorakhpur, DaundKalaburagi तसेच SolapurKalaburagi / Anakapalle या मार्गांचा समावेश आहे.

या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन अधिक सोयीस्करपणे करता येणार असून गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. या गाड्यांचे वेळापत्रक, थांबे आणि आरक्षणाची सविस्तर माहिती Central Railway कडून लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 🚆☀️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *