महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २५ सप्टेंबर | आज सोन्याच्या भावात थोडीशी घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत सोन्याचे भाव सुमारे ₹600 नी कमी झाले असून, भारतातील प्रमुख शहरांमध्ये – दिल्ली, लखनऊ, जयपूर, नोएडा, गाझियाबाद, मुंबई आणि पुणे येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे ₹1,15,500 प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे. चांदीचे भावही ₹100 नी कमी झाले असून ते ₹ 1,39,900 प्रति किलोवर आले आहेत.
आज किंमतीत घट झाली असली तरी सोनं अजूनही आपल्या उच्चांकी स्तराजवळ व्यवहार करत आहे. यामागे देशांतर्गत कारणांपेक्षा आंतरराष्ट्रीय कारणे महत्त्वाची आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह वर्षाअखेरीस व्याजदर कमी करू शकते, अशी अपेक्षा बाजारात व्यक्त होत आहे. व्याजदर कमी झाल्यास डॉलर आणि बाँड्स कमकुवत होतात आणि गुंतवणूकदार सोनं-चांदीसारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळतात.
गुंतवणूकदार आणि सेंट्रल बँकांची मागणी वाढली
यासोबतच जगभरातील मोठे गुंतवणूकदार आणि केंद्रीय बँका सतत सोन्याची खरेदी करत आहेत. एक्स्चेंज-ट्रेडेड फंड्स (ETF) मध्येही गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. या सर्व कारणांमुळे सोनं आणि चांदीची मागणी वाढली असून त्यांच्या किंमती उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे भाव
मुंबई: 24 कॅरेट सोनं ₹1,15,360 प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोनं ₹1,05,740 प्रति 10 ग्रॅम
पुणे: 24 कॅरेट सोनं ₹1,15,360 प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोनं ₹1,05,740 प्रति 10 ग्रॅम
कोलकाता: 24 कॅरेट सोनं ₹1,15,360 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट ₹ 1,05,740 प्रति 10 ग्रॅम
दिल्ली: 24 कॅरेट सोनं ₹ 1,15,510 प्रति10 ग्रॅम, 22 कॅरेट ₹ 1,05,890 प्रति 10 ग्रॅम
घसरण झाल्यानंतरही सोन्याची चमक कमी झालेली नाही. जागतिक आर्थिक घडामोडी, व्याजदरातील संभाव्य कपात आणि वाढती गुंतवणूक यामुळे सोनं अजूनही सुरक्षित आणि आकर्षक पर्याय ठरत आहे. नवरात्रीच्या काळात या मौल्यवान धातूची मागणी आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.