महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १ ऑक्टोबर | गाझामध्ये सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 कलमी शांतता प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी ट्रम्प यांनी ‘हमास’ला तीन ते चार दिवसांची वेळ दिली आहे. हा प्रस्ताव मान्य न केल्यास या युद्धाचा अंत तुमच्यासाठी दुःखद असेल, असा इशारा त्यांनी इमासला दिला आहे. ‘गाझा शांतता प्रस्तावावर सर्व अरब देशांनी सह्या केल्या आहेत. मुस्लिम देशांनी सह्या केल्या आहेत. इस्रायललाही हा प्रस्ताव मान्य आहे. आता फक्त हमासच्या होकाराची प्रतीक्षा आहे, असे ट्रम्प म्हणाले.
काय आहे ट्रम्प यांचा प्रस्ताव?
गाझापट्टी कट्टरपंथी आणि दहशतमुक्त केली जाईल.
गाझाची पुनर्बांधणी केली जाईल.
करार होताच युद्ध संपेल. इस्रायली सैन्य माघार घेईल.
लष्करी कारवाया स्थगित करून दोन्हीकडून एकमेकांच्या ओलिसांची सुटका केली जाईल.
शरण येणाऱ्या हमास सदस्यांना माफी दिली जाईल.
गाझा सोडू इच्छिणाऱ्यांना सुरक्षित मार्ग दिला जाईल.