महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १० ऑक्टोबर |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा. घाईने कामे उरकू नका. सहकार्यांच्या हातात हात घालून चला. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका. गुरुतुल्य व्यक्तीकडून प्रेरणा मिळेल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
अकारण पैसा खर्च होऊ शकतो. दिवस उर्जावर्धक राहील. कष्टाला पर्याय नाही. कामे गतीने पूर्णत्वास जातील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
मित्रांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. खाण्यापिण्याची चंगळ राहील. जवळचा प्रवास चांगला राहील. कामाचा अधिक भार येऊ शकतो. जोडीदाराच्या प्रगल्भतेचे कौतुक कराल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. चटपटीत पदार्थ खाल. हातातील अधिकार योग्य वेळी वापरा. नातेवाईकांची गाठ पडेल. जोडीदाराच्या भावना लक्षात घ्या.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope )
जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. व्यायामाचा कंटाळा करू नका. भावंडांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दिवस आपल्या इच्छेप्रमाणे घालवाल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
आपल्या कामात यश मिळेल. नियोजनबद्ध कामे कराल. आवडीची कामे करण्यावर भर द्याल. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. जोडीदाराशी समजूतदारपणे वागा.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
कौटुंबिक खर्च निघतील. कामाची क्रमवारी ठरवा. बोलण्यातून लोकनवरती प्रभाव पाडाल. झोपेची तक्रार जाणवेल. समस्यांना संयमाने तोंड द्या.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
लोक तुमचा सल्ला विचारायला येतील. अधिकार्यांच्या सल्ल्याने वागा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. फक्त कामावरच लक्ष केन्द्रित करा. आर्थिक चिंता मिटेल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
मदत केल्याचा आनंद मिळवाल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. परोपकाराची भावना जोपासाल. तरुणांच्या सहवासात रमाल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
नोकरीत सांभाळून निर्णय घ्या. कमिशन च्या व्यवसायात चांगली कमाई कराल. धार्मिक भावना वाढीस लागेल. गरज नसेल तर प्रवास टाळावा. भावंडांशी मतभेद टाळा.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
मनातील निर्णय जोडीदारासमोर मांडा. तिखट शब्दांचा वापर टाळा. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. जुन्या विचारांना चिकटून राहू नका.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
क्षुल्लक गोष्टी नजरेआड करा. जोडीदाराशी शांतपणे वार्तालाप करा. अती उत्साह दाखवायला जाऊ नका. योग्य संधीची वाट पहावी. उष्णतेचे त्रास संभवतात.