महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ८ ऑक्टोबर | दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी होते. यापैकी काही फटाके, पर्यावरणासाठी हानिकारक असताना, तर काही फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदुषण होते. यावर उपाय म्हणून आता पुणे पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विविष्ट वेळेत मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घालणार असल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
या वेळेत असणार बंदी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत पूर्णपणे बंदी घातली आहे. सर्वोच न्यायालयाच्या आदेशानुसार व पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार ही बंदी घालण्यात आली आल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर करवाई करण्यात येणार येईल, असा इशाराही पुणे पोलिसांकडून देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे रस्ते, पूल, घाट, सेतू, मार्ग, किंवा त्यापासून १० मीटरच्या परिसरात फटाके उडवण्यास सक्त मनाई असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
तात्पुरते परवाने दिले जाणार
याशिवाय फटाकेविक्री करणाऱ्यांना तात्पुरते परवाने दिले जाणार असल्याची माहितीही पुणे पोलिसांनी दिली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही २० ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर फटाके विकणाऱ्यांना तात्पुरते परवाने दिले जाणार असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे.स
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश काय?
दरम्यान, सर्वोच नयायलयाने फटाक्यांबाबत काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, फटाक्यांचा आवाज १२४ डेसिबल पेक्षा जास्त असू नये, असं न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच १०० पेक्षा जास्त साखळी फाटकांच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर बंदी, शांततेच्या भागात म्हणजे शाळा, रुग्णालय, आणि न्यायालयाच्या परिसरात १०० मीटरच्या आत फटाके उडवण्यास बंदी असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे.