महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ८ ऑक्टोबर | पुण्यात आज अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली. गेल्या ७ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला.
पुणे- पिंपरी चिंचवड दुपार नंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली . गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुण्यात पुन्हा हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे पुणे- पिंपरी चिंचवडकरांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसामुळे नागरिकांची तारंबळ झाली .
पुण्यातील मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाने हजेरी लावली. गेल्या ७ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे पुण्यात दमदार पुनरागमन केले. हवामान विभागाने पुण्यासह अनेक जिल्ह्यात आज पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज शहरातील मध्यवर्ती भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला.