महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. ७ सप्टेंबर – पावसाळ्यात प्रत्येकाला डासांचा त्रास होतो. बऱ्याच वेळा रात्री झोपताना डास चावत असल्यामुळे झोप पूर्ण होत नाही. डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया सारखे गंभीर आजार डासांमुळे मोठ्या प्रमाणात पसरतात. अशातच डासांपासून वाचण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. कॉइल, रिपेलेंट्स, मॅट किंवा मॉसकीटो लिक्विड इ.चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे अनेकांना श्वास घ्यायला त्रास होतो. अशा परिस्थितीत घरगुती उपाय तुमच्या कामी येईल… पाहूयात डासांना जवळही येऊ न देणारे घरगुती उपाय…
१) भीमसेन कापूर सकाळ संध्याकाळी घरात जाळावा . दार आणि खिडक्या लावून ठेवा थोड्या वेळाने परत उघडा. असं केल्याने डास पळून जातील
२) कडुलिंबाचे तेल आणि कापूर यांचं मिश्रण एका स्प्रेच्या बाटलीमध्ये भरा. हा स्प्रेस तमालपत्रावर मारा आणि नंतर हे तमालपत्र जाळा. याच्या धुरामुळे डास घरातून पळून जातील.
३) झोपताना कडुलिंबाच्या तेलात कापूर मिसळा अन् त्याचा दिवा लावा. यामुळे डास जवळही फिरकणार नाहीत.
४) घरासमोर असणाऱ्या तुळशीच्या पानांचा रस लावल्यास डास चावत नाहीत. – डास चावल्यानंतर बऱ्याचदा त्या भागावर खाज सुटते. त्यामुळे तुळशीच्या पानांचा रस या प्रभावीत जागेवर लावल्यास खाज सुटणे बंद होते
५) पुदिन्याचा उग्र गंधामुळेही डास दूर पळतात. रात्री झोपण्याआधी हाता-पायांना १-२ पुदिन्याची पानं चोळावी. ज्यामुळे रात्रभर तुमच्याजवळ डास फिरकत नाही.
६) लसणाच्या काही पुड्या पाण्यात टाकून चांगलं उकळा. उकळल्यानंतर हे पाणी घरात शिंपडा.. लसणाच्या तिखट वासांमुळे डास घरात येणार नाही अन् घरातील डास बाहेर जातील.
(टीप : वरती फक्त सर्वसामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा कोणत्याही प्रकारे अचूक उपचाराचा पर्याय नाही.)