लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ११ ऑक्टोबर | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून मिळालेली ही दिवाळीची भेटच आहे.

अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र सामाजिक न्याय विभागाने यासाठीचा ४१० कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केला आहे.

महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी दोन महिन्यांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आतापर्यंत १ कोटी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. ज्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनाही यावेळचा हप्ता मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *