नांदेड; बेक वाटर मुळे झालेल्या नुकसानाची भरपाई द्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – नांदेड – दि. ८ सप्टेंबर – जिल्हातील धर्माबाद तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी धर्माबाद तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या बेक वाटर मुळे शेतीचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी म्हणून तालुक्यातील सर्व पक्षीय शेतकऱ्यांनी धर्माबाद येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांना देण्यात आले असुन उमरी ते धर्माबाद परेंत पाच कोल्हापुरी(के.टी.वेअर )बंधारे असल्यामुळे चाचणी बोर साठी निधी उपलब्ध तात्काळ करून द्यावा अन्यथा आम्ही मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी उपोषणास बसू असे निवेदनात नमूद केले असून

गोदावरी नदीच्या काठावर असणाऱ्या अटाळा, येल्लापूर,, चोंडी, चोळाखा, दिग्रस, पाटोदा थंडी (खु. बु)रोशनगाव, बाभळी, माष्टी, इलेगाव, मोखली, शेळगाव, रत्नाळी, या गावांची गोदावरी नदी शेजारी काही शेतकार्यांची जमिनी असून गोदावरी नदीच्या ब्याक वाटर मुळे ती पाण्याखाली जात असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्यामुळे शासनाने ठरवलेल्या निधी प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावे तर बोळसा, ता. उमरी पिपळगाव कारेगाव, चोळाखा, बेलगुजरी, येथील लघुपाट बंधारे विभागामार्फत मंजूर झालेल्या पाच ठिकाणी के.टी.वेअर बंधाऱ्यांन साठी तात्काळ चाचणी बोर साठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच धर्माबाद उमरी बिलोली या तालुक्यात सिंचनाचा कारेगाव नाला, या भागातील

शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी वरील क्षेत्र सिंचनाखाली आणून हरितक्रांती,चे स्वप्न साकार करून द्यावे अन्यथा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आम्ही सर्व पक्षीय शेतकरी उपविभागीय कार्यलय समोर उपोषणास बसू अस्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी धर्माबाद याच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, राज्याचे बांधकाम मंत्री.श्री.मा.ना.अशोकरावजी चव्हाण राज्याचे जलसंपदा मंत्री श्री.जयंत पाटील, जलसंपदा सचिव प्रदीप कुंभार व नांदेड जिल्हाचे जिल्हाधिकारी ड्रा.विपीन इटनकर यांना देण्यात आले असून या निवेदनावर श्री.गोविंद पाटील रोषनगावकर,सतीश पाटील हरेगावकर, सुनील पाटील बाभळीकर,चंद्रकांत पाटील पांगरीकर, माधव पाटील चोंडीकर, दिगंबर पाटील सोळुंखे, गणेश गिरी महाराज कारेगावकर, पिराजी पाटील चव्हाण पाटोदेकर, व्येंकट पाटील कदम बाभळीकर, गणेश धुपे जारिकोटकर, गफूर सरपंच सिरंजखोडकर, शंकर राजुरे पाटील शेळगांवकर, हणमंतराव पाटील नरवाडे धानोरेकर, विनोद पाटील जोगदंड माष्टीकर, आदींनी सह्या केल्या असून आमच्या वरील मागण्या मान्य न झाल्यास आम्ही उपोषणास बसणारच असल्याचे आमच्या प्रतिनिधीस फोन वर सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *