महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १६ ऑक्टोबर |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
आपली चिडचिड इतरांना दाखवू नका. संयम बाळगून वागा. नकारात्मक घटना फार मनावर घेऊ नका. कटू गोष्टी अनुकूल करण्याची कला शिकून घ्या. प्रिय व्यक्तीच्या भेटीचा योग.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
धार्मिक ग्रंथांचे वाचन होईल. व्यवसायात नीतिचा मार्ग अवलंबा. आजचा दिवस समाधानकारक ठरेल. नवीन ओळखीतून प्रतिष्ठा लाभेल. अप्रिय व्यक्तींची भेट त्रासदायक ठरेल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
मित्र व नातेवाईकांशी सलोख्याने वागा. उगाच वाईटपणा घेऊ नका. मौल्यवान वस्तु जपाव्यात. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल. जुनी कामे मार्गी लावाल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
नवीन कामाकडे लक्ष ठेवा. जे मिळेल ते पदरात पाडून घ्या. सन्मानात वाढ होईल. मुलांच्या जबाबदार्या व्यवस्थित पार पाडाल. कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
कौटुंबिक तिढा सोडवायला मदत कराल. मिळकतीचा नवीन स्त्रोत उत्पन्न होईल. एखाद्या कामासाठी अधिक धावपळ करावी लागेल. बोलण्यातून माधुर्य दर्शवाल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
जुन्या आजारांवर वेळीच लक्ष द्या. कोणतीही गोष्ट पुढे ढकलू नका. धनसंचयात वाढ होईल. व्यापारी क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित यश मिळेल. चांगल्या गोष्टीसाठी खर्च कराल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
आनंदाची अनुभूति घ्याल. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. एखादा मोठा व्यवहार पार पडेल. घरातील लोकांचा आनंद द्विगुणित होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
वडिलोपार्जित धनाचा लाभ होईल. कोणत्याही संशयित कामात अडकू नका. पराक्रमात वाढ होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अधिक धावपळ झाल्याने आराम करण्यावर भर द्यावा.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope )
जुन्या धार्मिक कथांचे श्रवण कराल. मन:शांती लाभेल. विरोधक माघार घेतील. एखाद्या व्यक्तीची भेट संस्मरणीय ठरेल. सासरच्या व्यक्तींकडून लाभ मिळेल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
दिवस आनंदात जाईल. जुनी सर्व कामे मार्गी लावाल. आर्थिक व्यवहारात यश येईल. जुने प्रयत्न फलद्रुप होतील. कार्यालयीन सदस्य कौतुक करतील.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
मानसिक गुंतागुंतीत अडकू नका. विचारपूर्वक पाऊले उचला. निराशाजनक घटना दुर्लक्षित कराव्यात. अडचणीतून मार्ग निघेल. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
घरात नवीन वस्तूंची खरेदी केली जाईल. जुने परिचित लोक भेटतील. भावंडांना मदतीचा हात पुढे कराल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. प्रवासात सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल.