महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १५ ऑक्टोबर | प्रत्येक महिला ही सक्षम असते. ती प्रत्येक क्षेत्रात आपले नाव उंचावत आहे. आता तर महिला स्वतः चा व्यवसायदेखील करत आहेत. महिलांना व्यवसाय सुरु करण्याठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहे. राज्य सरकारने आता ग्रामीण भागातील महिलांसाठी एका खास योजना राबवली आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी पंचायत समिती शिलाई मशिन योजना सुरु केली आहे.
पंचायत समिती शिलाई मशिन योजना काय आहे? (What is Panchayat Samiti Silali Machine Yojana)
राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशिन खरेदी करण्यासाठी ९० टक्के अनुदान मिळणार आहे. उरलेली १० टक्के रक्कम ही तुम्हाला स्वतः द्यावी लागणार आहे. यामुळे महिलांवर शिलाई मशिन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार येणार नाही.
योजनेचा उद्देश
या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना घरच्या घरी शिवणकामाचा व्यवसाय सुरु करता येणार आहे. यामुळे महिला अधिक स्वावलंबी होऊ शकतात. महिलांना शिवणकामाची संधी मिळते. ज्या महिलांनी शिवणकामाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाते.
पात्रता
या योजनेसाठी अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी हवी.
२० ते ४० वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.
दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. महिलांकडे रेशन कार्ड असावे.
महिलांकडे शिवणकामाचा कोर्स केल्याचे प्रमाणपत्र हवे.
योजनेसाठी अर्ज कसा करावा? (How to Apply For Siali Machine Scheme
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा. तिथे तुम्ही अर्ज करु शकतात. अर्ज करताना तुमच्याकडे ही कागदपत्रे आवश्यक आहे.
आधार कार्ड
उत्पन्न प्रमाणपत्र
जन्माचा दाखला
रहिवासी प्रमाणपत्र
रेशन कार्ड
विधवा किंवा अपंग प्रमाणपत्र असल्यास