SBI कडून यावर्षी १४ हजाराची भरती योजना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. ८ सप्टेंबर – भारतीय स्टेट बँकेने सांगितलं आहे की, यावर्षी १४ हजार नियुक्तीची मोठी योजना आखणार आहे. SBI ने सांगितल्याप्रमाणे आपला व्यवहार अधिक विस्तारीत करण्यासाठी त्यांना आणखी काही लोकांची आवश्यकता आहे. तसेच बँकेने असे देखील स्पष्टीकरण दिलं आहे की, वीआरएस स्कीम कॉस्ट कटिंगकरता नाही आहे. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध नाही.

देशातील सर्वात मोठी बँक म्हणून एसबीआयकडे पाहिलं जातं. स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना म्हणजे VRS बँकेतील उपस्थिती कमी करण्यासाठी नाही आहे. आधीच्या माहितीनुसार, बँकेने कर्मचाऱ्यांकरता VRS ची योजना आणली आहे. यामध्ये जवळपास ३०,१९० कर्मचारी येऊ शकतात. या दरम्यान पीटीआयला बँकेच्या प्रवक्तांनी सांगितल्यानुसार, बँकेचा विस्तार वाढवण्यासाठी ही VRS योजना नाही.

काय आहे बँकेचं म्हणणं?
बँकेद्वारे जाहिर करण्यात आलं की, ‘बँक कायम कर्मचाऱ्यांशी मैत्रीपूर्वक वागते. बँक आपला व्यवहार वाढवत आहे. ज्याकरता आणखी काही लोकांची आवश्यकता आहे. यावरून हे स्पष्ट होतं की, बँकेला १४,००० पदांकरता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची आहे.’

त्यांनी म्हटल्यानुसार, स्टेट बँकेत सध्या जवळपास अडीच लाख कर्मचारी आहे. बँक आपल्या कर्मचाऱ्यांच्या गरजा जाणून त्या पूर्ण करू इच्छिते.

https://twitter.com/ANI/status/1302987031384006656?s=20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *