महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. ८ सप्टेंबर – करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी रशियाने विकसित केलेली ‘स्पुटनिक व्ही’ ही लस भारतात दाखल होणार आहे. याच महिन्यात ही लस भारतात येणार आहे. या लशीची अंतिम टप्प्यातील चाचणी भारतातही होणार आहे. रशियाने करोनाच्या संसर्गाला अटकाव करणारी विकसित केलेली लस ही प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे समोर आले आहे.
लस चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यात ही लस अतिशय सुरक्षित असल्याचे आढळले आहे. लस उत्पादन करण्यासाठी निधी जमवणारी संस्था रशियन डायरेक्ट इनवेस्ट फंडचे सीईओचे किरील दिमित्री यांनी सांगितले की, या लशीची क्लिनिकल चाचणी भारतासह युएई, सौदी अरेबिया, फिलिपीन्स आणि ब्राझीलमध्ये होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणीचा प्राथमिक अहवाल ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जाहीर करण्यात येणार आहे.
