महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २२ ऑक्टोबर २०२५ | तंत्रज्ञानात पुढारलेला चीन आता थेट अमेरिकेलाच आव्हान देत आहे! ज्याचे स्वप्न अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाहिले होते, ते चीनने प्रत्यक्षात आणले आहे. ट्रम्प यांनी जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने “गोल्डन डोम” नावाचे एक सर्वव्यापी संरक्षण जाळे उभारण्याचे स्वप्न पाहिले होते — जगात कुठूनही डागलेले क्षेपणास्त्र ट्रॅक करून नष्ट करण्याचे तंत्र विकसित करायचे होते.अमेरिका अजूनही या यंत्रणेच्या प्रयोगशाळेत अडकली असताना, चीनने मात्र हे स्वप्न वास्तवात उतरवले आहे!
चीनने आपल्या या अत्याधुनिक संरक्षण प्रणालीला ‘बिग डेटा प्लॅटफॉर्म’ असे नाव दिले असून, हे जगातील पहिले जागतिक क्षेपणास्त्र संरक्षण नेटवर्क असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चीनच्या लिबरेशन आर्मीने कोणतीही औपचारिक परवानगी न घेता हे तंत्र थेट कार्यरत स्थितीत आणले आहे!
नानजिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी येथील ली जुदोंग यांच्या नेतृत्वाखालील टीमने हे अत्याधुनिक तंत्र विकसित केले आहे. या प्रणालीद्वारे चीनवर डागलेले कोणतेही क्षेपणास्त्र काही क्षणांत ट्रॅक करता येते — आणि तेही एकावेळी तब्बल १,००० क्षेपणास्त्रांपर्यंत ! अंतराळ, समुद्र, हवा आणि जमिनीवर पसरलेल्या सेन्सर्सच्या आधारे हा “गोल्डन डोम” संभाव्य धोके शोधतो, त्यांचे विश्लेषण करतो आणि क्षणार्धात प्रतिसाद देतो.
या घडामोडीनंतर अमेरिका आणि तिच्या सहयोगी देशांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.जागतिक सामरिक समीकरणे आता पूर्णपणे बदलू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.
