![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २४ ऑक्टोबर २०२५ | लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. दिवाळीत भाऊबीजेचा मूहूर्त साधत पैसे जमा करतील, अशी अपेक्षा महिलांना होती. परंतु दिवाळीत लाडक्या बहिणींना खुशखबर मिळाली नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जाणार आहे.
ऑक्टोबर महिना संपायला अवघे ८ दिवस उरले आहेत. अद्याप लाडकीच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे हा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑक्टोबरचा हप्ता कदाचित पुढच्या महिन्यात दिला जाईल, असं सांगण्यात येत आहे.
ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर?
ऑक्टोबर महिना संपायला काही दिवस उरले आहेत. त्यामुळे ऑक्टोबरचे १५०० रुपये पुढच्या महिन्यात दिले जातील. सप्टेंबर महिन्याचाही हप्ता लांबणीवर गेला होता. मागील अनेक महिन्यांपासून लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे मिळत नाही. त्यामुळे हा हप्तादेखील लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. हा हप्ता नोव्हेंबर महिन्यात येण्याची शक्यता आहे.
या दिवशी येऊ शकतात पैसे
लाडकी बहीण योजनेत मागील अनेक महिन्यांपासून हप्ता लांबणीवर गेला आहे. हप्ता लांबणीवर गेल्यानंतर त्याच्या पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळेच नोव्हेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात कधीही पैसे जमा केले जातील, अशी शक्यता आहे.लाडकी बहीण योजनेत महिलांची केवायसी सुरु आहे. केवायसी प्रोसेस पूर्ण करणे अनिवार्य आहे. यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. तुम्हाला दोन महिन्यात केवायसी पूर्ण करायची आहे.
